सध्या नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे आणि या फोनवर चांगले फोटो काढणे सोपे असल्याने स्मार्ट तरुणांना पदोपदी फोटो काढण्याचे वेड जडलेले आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेल्फीच्या वैशिष्ट्यामुळे स्वतःचाच फोटो काढणे सोयीचे झाले आहे. हा अतिरेक काहींच्या बाबतीत व्यसनाकडे झुकू लागला आहे.