आधुनिक मानवी जीवनात डिजिटल पायाभूत सुविधांचा होत असलेला वापर लक्षात घेता, सायबर विश्वाने युद्धासाठी नवे क्षेत्र निर्माण केले आहे, ही बाब अनेक राष्ट्रे तसेच नेटोसारख्या लष्करी संस्थांनीदेखील मान्य केली आहे. अमेरिकेने सुरुवातीला लष्करी वापरासाठी आणि तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी इंटरनेट विकसित केले.