पत्रलेखन ही खरोखरंच एक कला आहे. ती ज्याला साधली, त्याला पत्रातून समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्यासारखं वाटतं, बोलता येतं, रागावता येतं, रुसता येतं, आनंद साजरा करता येतो, दु:खही वाटून घेता येतं. कारण पत्रलेखन हा जणू समोरच्या व्यक्तीबरोबर साधलेला संवादच असतो.