पण कोरोनाच्या विरोधातील ही लढाई कोणत्याही एका माणसाचे यश नाही. हा अवघ्या भारतवासीयांचा बदललेला दृष्टिकोन आहे. स्वतःला बंदिस्त ठेवून, हजारो कोटी रुपयांच्या तोट्याची चिंता न करता प्रत्येक भारतीय कोरोनाशी लढण्यात गुंग झाला आहे. पण या यशाला काही पाश्चिमात्य संशोधन संस्था आणि माध्यम कंपन्या चाचण्यांचे गालबोट लावत आहेत, त्यांच्यासाठी हे प्रत्युत्तर आहे.