मनाने निरोगी असणे म्हणजे काय? मनाने निरोगी असणारी व्यक्ती कायमच स्वतःच्या वाढीचा विचार करते. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. आपले विचार, मत, अनुभव यातून सतत काहीतरी शिकत असते. नवीन गोष्टींसाठी ती व्यक्ती कायम तयार असते. अशांचे जीवन प्रवाही असतेव ते मानसिक स्वास्थ्य अनुभवत असतात.