सेक्रेड गेम्स – दुसरा सीझन येतोय!

सेक्रेड गेम्स - दुसरा सिझन येतोय! Source: Hindustan Times

बदलत्या काळानुसार, येणारे दिवस हे वेबमालिकेचेच ठरणार आहेत. गेले कित्येक दिवस गाजत असलेल्या सेक्रेड गेम्स या लोकप्रिय वेबमालिकेचा दुसरा”सीझन” आज १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

“सेक्रेड गेम्स” ही मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलेली वेबमालिका. या वेबमालिकेविषयी खूप चर्चा ऐकली असल्याने मी ती बघितली. हल्ली तरुण पिढीलाआकृष्ट करणारा मनोरंजनाचा प्रकार म्हणजेच या वेबमालिका आहेत, त्या लोकप्रिय करण्याकरिता सर्व प्रथम नेटफ्लिक्स या माध्यमाचे तोंडभरून कौतुक केलेपाहिजे. सध्याच्या सासू-सुनेच्या भिकार मालिकांना सेक्रेड गेम्स सारख्या वेबमालिका हे खणखणीत उत्तर आहे. माझ्या पिढीला तरी अनेक हिंदी-मराठीवाहिन्यांवरील एकही मालिका बघायच्या लायकीची वाटत नाही. माझ्याच पिढीच्या, किंवा १८ ते ४५ या वयोगटातील अनेकांच्या घरच्या ज्येष्ठ मंडळींना यावाहिन्या बघितल्याशिवाय चैन पडत नाही. या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स हे अतिशय उत्तम माध्यम आहे.

नवाजउद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान, जितेंद्र जोशी, नीरज काबी, पंकज त्रिपाठी, गिरीश कुलकर्णी यांनी उत्तम अभिनय केला आहे. या मालिकेमध्ये जी पात्रनिवड केली आहे ती चपखल वाटते. विशेष कौतुक सैफ अली खानचे. मी सैफचा कधीच फॅन नव्हतो, पणसरताज ज्या ताकदीने त्याने उभा केला आहे, त्याकरिता नक्कीच त्याचे कौतुक केले पाहिजे. त्याने साकारलेला पोलीस ऑफिसर सरताज लक्षात राहील असाचआहे. सैफचा दमदार अभिनय हे खूप मोठे ‘सरप्राईज एलिमेंट’ आहे.

नीरज काबी हे नाटक-थेटर मधील मोठे नाव आहे. त्यांनी साकारलेला वरिष्ठ पोलीस अधिकारी पारुलकर लक्षात राहतो. जितेंद्र जोशीला कॉन्स्टेबल काटेकरउत्तम जमलाय. सरताजच्या बरोबरीनेच पुढे सरकणारे हे पात्र एवढे लोकप्रिय झाले की पहिल्या सीझन मध्ये मरुन सुद्धा ते परत जिवंत करावे अशी अनेकांनीमागणी केली. गिरीश कुलकर्णी यांचा मराठी मिश्रित हिंदी बोलणारा राजकारणी भाव खाऊन जातो. जितेंद्र जोशी,सैफ आणि नीरज काबी हे पोलीस दलातलेचवाटतात, इतका जिवंत अभिनय तिघांनी केलाय. पोलीस खात्यातील लोकांचे वागणे, त्यातील राजकारण, हे ही वास्तववादी वाटते. 

नवाजउद्दीन सिद्दीकी या गुणी आणि सशक्त अभिनेत्याने तर मन जिंकले आहे. “कभी कभी लगता है की अपूनही भगवान है” म्हणणारा गणेश गायतोंडे उभाकरताना त्या व्यक्तिमत्वाच्या विविध छटा त्याने सुंदर प्रकारे  दाखवल्या आहेत. नवाजउद्दीनने गायतोंडेचा बेदरकारपणा आणि तितकाच संवेदनशीलपणाउत्कृष्टपणे रेखाटला आहे. मुंबईबाबत त्याचे प्रेम दर्शवताना त्याचा क्रुर व मग्रूर चेहरा दाखवण्यात नवाज पूर्णपणे यशस्वी ठरतो.

या सिरीजचे शीर्षक गीतही अल्पावधीत लोकप्रिय ठरले.

कथानकाबद्दल सांगायचे झाले तर आपल्यासारखी सामान्य दिसणारी, असणारी व्यक्ती (नवाजउद्दीन) डॉन कशी बनते याची कथा म्हणजे सेक्रेड गेम्स. गायतोंडे आणि सरताज यांच्या दोन वेगवेगळ्या कालखंडात समांतर चालणारी कथा म्हणजे सेक्रेड गेम्स. 

विक्रम चंद्रा यांच्या “सेक्रेड गेम्स” या पुस्तकावर आधारलेल्या या मालिकेमध्ये आत्तापर्यंत संपूर्ण कथानकाचा फक्त २५% भाग घेतलाय. आज आलेल्यासिझनमध्ये बहुदा बाकीचा भाग येईल.

गायतोंडे आणि सरताज ही सेक्रेड गेम्सची दोन प्रमुख पात्रे असली तरी त्यांना पूरक अशी अनेक लहान-मोठी पात्रे येतात. त्या पात्रांचे तपशील अतिशयउत्तमप्रकारे व्यक्त झाले आहेत. मालिकेचे चित्रीकरण न वाटता ते सर्व प्रत्यक्षात घडतंय असेच वाटते. मुंबईचे यथार्थ चित्रण आहे. मी स्वत: मराठी भाषिकअसल्याने जितेंद्र जोशी, राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, नेहा शितोळे, राजश्री देशपांडे हे मराठी कलाकार यात काम करतात याचे विशेष कौतुक वाटते.

या वेबमालिकेचे दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी  हे अतिशय हुशार आहेत. कुठेही ही सिरीज कंटाळवाणी झालेली नाही, याचे पूर्ण श्रेयअनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांना जाते. कथानक कायम वेगवानरित्या पुढे जात राहते. एक वेबमालिका आणि दोन दिग्दर्शक, असेहीपहिल्यांदाच घडत आहे. या वेबमालिकेमध्ये शिव्या जरी असल्या तरी त्या ऐकताना बघताना विचित्र वाटत नाही, कारण कथानकाचा तो अविभाज्य भाग आहे. 

मात्र संस्कारी गोपाळांनी या वेबमालिकेच्या नादी लागू नये; त्यांच्याकरिता असंख्य सुमार मालिका आहेत. वेबमालिका आणि इतर वाहिन्यांवरील मालिकायांतील मुख्य फरक असा आहे की  इतर वाहिन्यांवरील मालिका ५ ते ७ वर्षें झाली तरी संपत नाहीत. बरं, एवढी वर्षें चालू राहूनही त्यांत विशेष काहीच घडतनाही. अत्यंत फालतू, बालिश कथानक असते. या उलट वेबमालिका लवकर संपतात; ८ ते १० भागात एक सीझन संपलेला असतो. वेळ तसा कमी असल्यानेत्यातील कथानके वेगवानरित्या पुढे जातात. ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘नारकोस’ या परदेशात बनलेल्या आणि अफाट लोकप्रिय असलेल्या वेबमालिकांप्रमाणेच, त्याचदर्जाची हिंदी मध्ये सेक्रेड गेम्स ही वेब मालिका बनली आहे. वेबमालिका बघायचे अजून एक कारण म्हणजे त्यात जाहिराती नसतात आणि रसभंग होत नाही. सलगता राहते.

पहिला सिझन ८ भागांचा होता. त्यातील भागांची नावे ही अश्वथामा, हलाहल, आतापी वातापी, ब्रह्महत्या, सरमा, रुद्र, ययाति आशी असून प्रत्येक भागाचासबंध त्या नावांशी आहे. त्यानुसार त्या भागातील घटनाक्रम आहेत. पहिला सीझन एवढा रोमांचक बनविल्याने दुसऱ्या सीझनविषयी कमालीची उत्सुकता आहे. पहिल्या सीझनमध्ये थोडी झलक दिसलेल्या पंकज त्रिपाठी या अजून एका गुणी आणि कसदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्याची महत्त्वाची भूमिका हेही दुसऱ्यासीझनचे हेही आकर्षण आहे. त्रिपाठी यांचा अभिनय बघणे ही दर्शकांसाठी मेजवानीच आहे. मी पहिला सीझन बघायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला वाटतहोतं ‘१० ते १२ दिवसांत आपण हे बघून संपवू’ पण पहिला भाग बघितल्यावर मी एवढा काही भारावला गेलो की मी अख्खा सीझन दोन दिवसांत बघूनसंपवला. एखादी गोष्ट हाती घेतली आणि ४८ तासांत संपवली, हे अनेक वर्षांनी घडले. खूप दिवसांनी काहीतरी भारी केल्यासारखे वाटले होते. तर सरतेशेवटी एवढेच सांगेन की दुसरा सीझन येतोय, त्याच्या आत पहिला सीझन नक्कीच बघा. एक वेगळे कथानक मांडले जात आहे, याचा नक्की आनंदघ्या.

मंदार चक्रदेव

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *