सेक्रेड गेम्स आणि नेटफ्लिक्सचं मार्केटिंग!

सेक्रेड गेम्स आणि नेटफ्लिक्सचं मार्केटिंग! Source: Capshun App

गणेश गायतोंडे, त्रिवेदी, काटेकर, सरताज ही सगळी नावं जर तुम्हाला २८ जून २०१८ च्या आधी सांगितली असती, तर त्यांचं तुम्हाला एवढं विशेष काही वाटलंनसतं. पण या तारखेनंतर या नावांना एक विशेष वलय प्राप्त झालं. लोक या सगळ्यांच्या प्रेमात पडले. का? कशामुळे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यासगळ्यांना माहिती आहेतच आणि आता यांच्याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं लवकरच मिळतील, कारण “सेक्रेड गेम्स”चा दुसरा सीझन आजसगळ्यांच्या समोर येत आहे.

कोणतीही कलाकृती असो, ती योग्य प्रेक्षकांसमोर पोहोचणं अत्यंत महत्वाचं असतं आणि ते काम जर योग्य पद्धतीने पार पडलं तर अर्थात ती कलाकृतीसगळ्याच बाजूंनी यशस्वी ठरते. 

सेक्रेड गेम्सच्या आधी मालिका येत नव्हत्या का? तर येत होत्या, पण त्या एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या नाहीत याचंसगळ्यात मोठं कारण म्हणजे मार्केटिंग! 

कलाकृती कितीही मोठी असो, कितीही बजेट लावलेलं असो, कितीही दिग्गज कलाकार असो, तिचं जर योग्य मार्केटिंग केलं नाही, तर ती सपशेल फसते. हेचनेटफ्लिक्सने ओळखलं आणि सेक्रेड गेम्ससाठी खास काम सुरु झालं!

माध्यमं आणि त्यांची वैशिष्ट्ये!

फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर या तीनही प्लॅटफॉर्म्सचा एखाद्या मालिकेसाठी नेमका कसा वापर करता येऊ शकतो हे यांनी व्यवस्थित दाखवून दिलं. एकदाएखादी मालिका लॉन्च झाली तर कदाचित कलाकारांचं काम संपू शकेल, पण मार्केटिंग करणाऱ्यांचं नाही! नेटफ्लिक्स इंडियाने सतत कोणत्या ना कोणत्यामाध्यमातून लोकांना जोडून ठेवलं. मालिकेच्या लॉन्च नंतर जे जे काही ट्रेंड्स आले त्यात सेक्रेड गेम्स किंवा त्यातली पात्रं समोर आणली; अर्थात, त्यात विनोदतयार झाला आणि भरपूर चर्चा सुद्धा झाली! मिम्सची आज चलती आहे, पण कोणतीही स्ट्रीमिंग करणारी कंपनी किंवा प्रोडक्शन हाऊस एवढ्या मोठ्याप्रमाणावर मिम्स तयार करून मार्केटिंग करेल असं कोणाला कधी वाटलंही नसेल. पूर्वीच्या काळी जशा गावाखेड्यांत पारावर चर्चा व्हायच्या तशा इथं आधीसोशल मीडियावर आणि मग लोकांमध्ये चर्चा सुरु व्हायला लागल्या. हेच त्यांच्या मार्केटिंगचं मोठं यश आहे!

अनियोजित गोष्टी!

आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे राधिका आपटे आणि तिचं नेटफ्लिक्सवरचं जे काही काम आहे ते त्यांनी ज्या पद्धतीने समोर आणलं, जो ट्रेंड तयार केला तोलाजवाब होता. त्या दरम्यान नेटफ्लिक्स = राधिका आपटे असा ट्रेंड समोर आला होता. पण राधिकानं स्वतः एका मुलाखतीत सांगितलं की सलग आलेलं कामहे काही ठरलेलं  नव्हतं. नेटफ्लिक्स बॅनरसोबतचं तिचं काम फक्त सेक्रेड गेम्स हेच होतं. ‘घूल’ असेल किंवा ‘लस्ट स्टोरीज’ असेल, हे काही नेटफ्लिक्स निर्मातीतनव्हते. पण हा जो ट्रेंड आला, त्याचा सेक्रेड गेम्सला आणि अर्थात नेटफ्लिक्स इंडियाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. 

ऑफ  ट्रॅक – काहीतरी वेगळं!

माझ्या अंदाजे जून २०१८ च्या पहिल्या आठवड्यात नेटफ्लिक्सने सेक्रेड गेम्स सोशल मीडियावर समोर आणलं. यातले संवाद, भावना त्यांनी समोर आणल्याआणि त्यांचा संबंध जोडला सामान्य जनतेच्या भावनांशी. मग त्यात  त्यांनी कोणतेच बंधन ठेवले नाही, यात त्यांनी अगदी स्नॅपचॅट सारखे फिल्टर्स वापरले, “टॉपिकल मिम्स” केले, “देसी टच” असणाऱ्या पोस्ट्स केल्या, प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या आणखी काही वेबमालिकांची “क्रॉस” जाहिरात केली जेणेकरून अगणितलोक सेक्रेड गेम्सशी जोडले गेले. लोकांपर्यंत सेक्रेड गेम्स पोहोचलं आणि त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. एकदा उत्सुकता निर्माण झाली की आपणसगळेच ती गोष्ट नेमकी काय आहे हे शोधतोच आणि इथेही तेच झालं.

फक्त उत्तम कंटेंट?

कंटेंट महत्त्वाचा आहेच पण तो योग्य प्रेक्षकांसमोर योग्य पद्धतीनं आणणं हे आज खूप महत्त्वाचं झालं आहे. नेटफ्लिक्सनं गुणवत्तेची एक विशिष्ठ पातळी ठरवूनदिली आहे. आज कित्येक वेबमालिका येत आहेत, पण त्या किती लोकांपर्यंत पोहोचतात? प्लॅटफॉर्मचा वापर किती होत आहे? या प्रश्नांवर किती लोकांनीकाम केलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जितेंद्र जोशी हा आपला मराठमोळा सशक्त अभिनेता, उत्तम काम  करणाऱ्यांपैकी एक, सेक्रेड गेम्समुळेत्याला जागतिक स्तरावर ‘काटेकर’ म्हणून ओळख मिळाली आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे! जतीन सरना या नावापेक्षा आज बंटी जास्तओळखीचा आणि जवळचा आहे, सैफ अली खान पेक्षा सरताज जास्त भावतो. सेक्रेड गेम्समध्ये उत्तम कंटेंट, अभिनेत्यांची तगडी फळी, उत्तम मार्केटिंग आणिसोशल मीडिया, या सगळ्या गोष्टींचा संगम झाला. सेक्रेड गेम्समधील सगळी पात्रं आज लोकांच्या लक्षात आहेत, लोक त्यांच्या प्रेमात आहेत, आणि त्यामुळेचसेक्रेड गेम्स आज एवढ्या मोठ्या स्तरावर पोहोचलं आहे.

मोठा प्लॅटफॉर्म

अर्थात त्यांना हे सगळं शक्य झालं ते मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळेच. प्लॅटफॉर्म असूनही योग्य पद्धतीनं  वापरता न येणारे बरेचजण असतीलही. त्यांनानेटफ्लिक्सची मार्केटिंग शैली आणि योजना ही खूप काही शिकवणारी आहे. आज भारतीय मनोरंजन क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली आणिअशा पद्धतीने समोर आलेली कदाचित ही आजवरची एकमेव वेबमालिका असू शकेल.

बाकीच्यांना आव्हान!

सध्या बरेच प्लॅटफॉर्म्स काही प्रमाणात का होईना त्यांच्याकडचं काम समोर आणायचा प्रयत्न करत आहेत, पण नेटफ्लिक्स इंडिया ज्या पद्धतीने काम करतंत्याला कोणाची सर नाही! सगळ्यांनाच नेटफ्लिक्सवर किंवा सेक्रेड गेम्ससारख्या वेबमालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळेलच असे नाही. त्यामुळे चांगल्याकलाकृती आणि कलाकारांसाठी बाकीचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना येत्या काळात खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. तुमच्याकडे फक्त उत्तमोत्तमकंटेंट असून भागणार नाही, तर त्याचा अपेक्षित प्रेक्षक कोण आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं हे नीट अभ्यास करून शोधावं, आणि त्या दृष्टीनं काम करावंलागणार आहे.

नेटफ्लिक्सनं नेमकं काय समोर आणलं?आजवर कोणी मार्केटिंग केलं नाही का? तर अर्थात केलंच आहे, पण अशा पद्धतीनं, एवढ्या मोठ्या पातळीवर आणि तेही एका वेब मालिकेसाठी केलं नसेल. माझ्या मतानुसार, नेटफ्लिक्स इंडियाने कलाकृतीची गोष्ट, त्यातली कलात्मकता आणि त्यातली पात्रं तेवढी मोठी केली. बाकी सगळं मोठं करायची गरजचपडली नाही, ते सगळं आपोआप मोठं होत गेलं! हेच ध्येय बाकीच्या मोठमोठ्या प्लॅटफॉर्म्सने ठेवलं तर कदाचित आणखी काहीतरी वेगळं चित्र पाहायलामिळेल.

योगेश विद्यासागर

योगेश विद्यासागर हे सोशल मीडिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे नाटकातले असून, त्यांनी ४ वर्षे रेडिओ क्षेत्रात काम केले आहे.

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *