पत्रलेखन फुलवते संवाद!

पत्रलेखन ही खरोखरंच एक कला आहे. PC: Deby Hudson Source: unsplash.com

नुकतीच मी एका पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. वेगवेगळ्या विषयांवरची, विविध लेखकांची, वैविध्यपूर्ण आकारांची, रंगांची, चित्रकारांच्या कुंचल्याने सजवलेली अनेक पुस्तकं तिथं अतिशय कलात्मक पद्धतीनं मांडून ठेवलेली होती. ती पुस्तकं पहावी, हाताळावी, कोऱ्या पुस्तकांचा वास घ्यावा, मध्येच एखादं पुस्तक चाळावं, असं करत करत मी प्रदर्शन पहात फिरत होतो.  

काही तरूण मुली ध्वनिक्षेपकावरुन नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती सांगत होत्या. ‘नवनवीन विषयावर, नव्या संशोधनावर, प्रसिद्ध झालेली पुस्तके पहा, परदेशी पर्यटनस्थळे आणि त्यांची माहिती सांगणारी पुस्तके हाताळा’, असं सुचवत होत्या. ज्या काही जुन्या नामांकित पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या निघाल्या आहेत, त्यांची माहितीपण सांगत होत्या. 

काही लोकांना आवर्जून त्यांच्या आवडीची पुस्तकं दाखवीत होत्या. एकूणच सारं वातावरण पुस्तकांची सहज खरेदी करण्यास सोयीचं होतं. फिरता फिरता माझं लक्ष एका पुस्तकानं वेधून घेतलं. 

आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी त्यांची कन्या इंदिरा गांधी यांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांच्या संग्रहाचं ते पुस्तक होतं. उभ्या उभ्या मी त्यातली दोन पत्रं वाचली आणि एकदम भारावून गेलो. किती सुंदर पत्रं होती ती! 

पत्रलेखनाचं पुस्तक सुद्धा इतकं सुंदर असू शकतं, याची जाणीव मला प्रथमच झाली.मी अक्षरश: त्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो. त्यानंतर अन्य कोणती पुस्तकं न बघता ते पुस्तक मी खरेदी केलं आणि घरी आलो. पूर्ण पुस्तक वाचून काढलं तेव्हा कुठे मनाचं समाधान झालं.

जवाहरलालजींनी आपल्या कन्येला लिहिलेल्या पत्रात जे विचार मांडले आहेत, त्याला त्या काळात घडलेल्या अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक घटनांचा संदर्भ आहे.

माननीय पंडित नेहरु यांची भाषा इतकी समृद्ध आहे की, त्यांनी लिहिलेलं विशिष्ट घटनेचं वर्णन वाचताना त्या घटनेचं संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ती घटना जणू नुकतीच घडून गेली असावी असा संभ्रम निर्माण होतो. 

विविध घटनांवर त्यांनी केलेलं भाष्य जसं वाचनीय आहे, तसंच चिंतनीय सुद्धा आहे. त्यावेळच्या सरकारतर्फे हाती घेतल्या जाणाऱ्या अनेक आगामी योजनांविषयी विस्तृत माहिती काही पत्रांमधून दिलेली आहे. सामान्य माणसालादेखील ते पत्र वाचून संपूर्ण योजना सहजरित्या समजते. 

वडील आणि मुलगी यांच्यामधला उत्तम सुसंवाद ज्याप्रमाणे या पत्रांमधून व्यक्त होतो, त्याचप्रमाणे विसंवाद देखील! हा विसंवाद का आहे आणि कोणत्या मुद्द्यांवर आहे, याची सविस्तर कारणमीमांसा त्यात केलेली आहे. 

आपल्या मुलीची मतं ठाम असावीत आणि यासाठी तिनं काय करायला हवं, याचं मार्गदर्शन देखील त्यांनी वडील या नात्याने केलेलं दिसतं. वडील आणि मुलगी यांचं एकमेकांशी बोलणं, एकमेकांसाठी प्रेमाने आसुसणं, रागावणं, चिडणं, सल्ला देणं, तो न ऐकल्यास नाराजी व्यक्त करणं आदी अनेक प्रकारच्या भावभावना या पत्रातून व्यक्त झालेल्या आहेत. म्हणूनच ही पत्रं एक उत्तम साहित्य प्रकार म्हणून प्रसिद्धीस आली, असं वाटतं. 

एवढ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तिला इतकी सुंदर पत्रं लिहायला कसा वेळ मिळाला, याचं मला एक कोडंच वाटलं. 

पत्रलेखन ही खरोखरंच एक कला आहे. ती ज्याला साधली, त्याला पत्रातून समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्यासारखं वाटतं, बोलता येतं, रागावता येतं, रुसता येतं, आनंद साजरा करता येतो, दु:खही वाटून घेता येतं. कारण पत्रलेखन हा जणू समोरच्या व्यक्तीबरोबर साधलेला संवादच असतो. 

पत्रलेखनाबद्दलच्या सगळ्या भावभावनांचा अनुभव आणि आनंद जुन्या पिढीने घेतला आहे.पण आजची तरुण पिढी मात्र या प्रकारच्या साहित्य प्रकाराला मुकली आहे. पत्र लिहिण्यातील आनंद, पत्राची वाट पहाण्यातली आतुरता, पत्र वाचताना प्रत्यक्ष भेटल्याचं मिळणारं समाधान या साऱ्या गोष्टींमधून मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव या पिढीला घेता येत नाही. 

सुहास परळे

सुहास परळे हे केंद्र शासनात ऑडिट ऑफिसर म्हणून २०१४ पर्यंत कार्यरत होते. ते सध्या विविध मासिकांमधे कविता, गोष्टी आणि लेख लिहितात.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *